तालुका : उरण, जिल्हा : रायगड
| अ. क्र. | पदाचे नाव | कर्तव्ये | शासन निर्णय |
|---|---|---|---|
| 1 | गट विकास अधिकारी | 1) पंचायत समिती अंतर्गत वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांच्या स्थापना विषयक बाबी. 2) जिल्हा परिषद, पंचायत समिती अधिनियम व ग्रामपंचायत अधिनियम संबंधित संवैधानिक कामे. 3) पंचायत समितीच्या लेखा विषयक बाबी. 4) पंचायत समितीकडे आलेल्या तक्रार अर्जांची चौकशी. 5) शासनाच्या तसेच जिल्हा परिषदेकडील व पंचायत समितीकडील विविध कामे व योजनांची अंमलबजावणी करणे. 6) ग्रामपंचायतींच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे. 7) पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. | महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 |
| 2 | सहाय्यक गट विकास अधिकारी | 1) सहाय्यक गट विकास अधिकाऱ्याकडे खालील विभागांचा स्वतंत्र कार्यभार असेल: कृषी समाजकल्याण महिला व बालकल्याण पशुसंवर्धन तसेच या चार विभागांसाठी प्रथम अपीलीय माहिती अधिकारी म्हणून काम पाहतील 2) ग्रामपंचायत संबंधित कामे: पाणी शुद्धीकरण योजना नवसंजीवनी योजना हिरवे / पिवळे / लाल कार्ड नियंत्रण 3) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक सर्व बाबी 4) तालुका मोफत कायदेविषयक सल्लागार समितीचे सचिव म्हणून काम करणे. | शासन निर्णय दि. 30 ऑक्टोबर 2014 |
| 3 | सहाय्यक प्रशासन अधिकारी | 1) कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे 2) दप्तरे (records) तपासणे 3) सामान्य प्रशासन कडील तपासणी मुद्दे पूर्ण करणे 4) अभिलेख वर्गीकरण करणे 5) कार्यालयीन कामांचा निपटारा जलद गतीने करणे 6) वर्ग 3 कर्मचाऱ्यांना कामासाठी मार्गदर्शन करणे | कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994 |
| 4 | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे. कर्मचाऱ्यांची दप्तरे तपासणी करणे. सामान्य प्रशासन कडील तपासणी मुद्द्यांची पूर्तता करून घेणे. अभिलेख वर्गीकरण करून घेणे. कार्यालयीन कामांचा निपटारा जलद गतीने करणे. वर्ग-3 च्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यासंदर्भात आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करणे. | कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 5 | वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) | वर्ग 3 च्या कर्मचाऱ्यांचे संवर्गीय फिरती कार्यक्रम व दैनंदिन कामकाज तपासून मंजुरीसाठी सादर करणे. सेवापुस्तके अद्यावत करून त्यामध्ये सर्व नोंदी घेणे. प्रवासभत्त्याचे देयके तपासून अर्थ शाखेकडे पारित करण्यासाठी सादर करणे. पंचायत समिती सभांचे इतिवृत्त तयार करणे व इतर सभांचे कामकाज पाहणे. सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे व सेवानिवृत्ती विषयक सर्व कामे करणे. ग्रामसेवक सभा आयोजन. सरपंच मानधन. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मानधन. मुद्रांक शुल्क/सापेक्ष अनुदान वाटप, देयके तयार करणे व वाटप करणे. वन जमीन दावे प्रस्ताव तयार करणे व पत्रव्यवहार. सरपंच/ग्रामसेवक प्रशिक्षण कार्यवाही व पत्रव्यवहार. योजना विषयक कामे व पत्रव्यवहार. | कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. म.जि.प. व पं.स. (अभिलेखांचे वर्गीकरण, परीक्षण व नाशन) नियम 1964. गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 6 | कनिष्ठ सहाय्यक | 1) सेवापुस्तके अद्यावत करून त्यामध्ये सर्व नोंदी घेणे. 2) प्रवासभत्त्याचे देयके तपासून सादर करणे. 3) कर्मचाऱ्यांचे प्रतिवेदन/नोंदी अद्यावत ठेवणे. 4) सेवानिवृत्ती प्रकरणे तयार करणे व संबंधित कामे करणे. 5) अनधिकृत गैरहजेरी/निलंबन/राजीनामा/कोर्ट केस प्रकरणांची माहिती तयार करणे. 6) मासिक वेतन देयके तयार करणे व वार्षिक वेतनवाढ नोंद करणे. 7) रजा मंजुरीचे प्रस्ताव पाठवणे. 8) आवक व जावक नोंदणीचे काम करणे. 9) अभिलेख वर्गीकरणाचे काम करणे. 10) समाजकल्याण विभागातील योजना व पत्रव्यवहार. 11) तगाई वसुली. 12) पाणीपुरवठा कार्यवाही व पत्रव्यवहार. 13) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कामकाज व पत्रव्यवहार. 14) संपूर्ण स्वच्छता अभियान योजना व पत्रव्यवहार. 15) शेती विभागातील योजनांचा पत्रव्यवहार. 16) पेन्शन देयके तयार करणे व इतर संबंधित कामे. | 1) कार्यालयीन कार्यपद्धती नियम पुस्तिका 1994. 2) म.जि.प. व पं.स. (अभिलेखांचे वर्गीकरण, परीक्षण व नाशन) नियम 1964. 3) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 7 | सहाय्यक लेखाधिकारी | 1) गट विकास अधिकाऱ्यांकडे देयके मंजुरीसाठी सादर करणे. 2) पंचायत समितीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे. 3) पंचायत समितीच्या खर्चाचे परीक्षण करणे. 4) महालेखाकार/स्थानिक निधी लेखा/पंचायत राज समिती कडील परिक्षण पूर्तता करणे. 5) चारमाही/आठमाही/वार्षिक अंदाजपत्रक तयार करून संबंधित विभागाकडे पाठवणे. | 1) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 8 | कनिष्ठ लेखाधिकारी | 1) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे लेखे अद्यावत ठेवणे. 2) हजेरी तपासून मंजुरीसाठी सादर करणे. 3) खर्च अहवाल तयार करणे व सादर करणे. | 1) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 9 | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | 1) प्रवासभत्ते/निवृत्ती वेतन देयके तपासणे व सादर करणे. 2) प्राप्त तरतूद व खर्च नोंदवहीत नोंदी घेऊन अद्यावत ठेवणे. 3) खर्च अहवाल सादर करणे. 4) लेखा विषयक पत्रव्यवहार पाहणे. | 1) महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981. 2) म.जि.प. व पं.स. लेखा संहिता 1968. 3) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 10 | कृषी अधिकारी | 1) कृषी विषयक विविध योजना राबवणे. 2) निविष्ठांची मागणी करणे. 3) पीक संरक्षण बाबत मार्गदर्शन करणे. 4) कृषी मेळावे आयोजित करणे. 5) लाभार्थी निवड करून प्रस्ताव सादर करणे. 6) खरीप व रब्बी हंगामात मार्गदर्शन करणे. 7) खते/बियाणे/कीटकनाशके बाबत मार्गदर्शन करणे. | 1) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 11 | आरोग्य पर्यवेक्षक | 1) प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन आरोग्य कार्यक्रम राबवणे. 2) आरोग्य अहवाल संकलन करणे. 3) आरोग्य विषयक सभा घेणे. 4) जन्म-मृत्यू अहवाल तयार करणे. 5) जन्म-मृत्यू दाखले देणे. 6) साथरोग नियंत्रणासाठी उपाययोजना करणे. 7) पाणी शुद्धीकरण व स्वच्छता जनजागृती करणे. | गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 12 | शाखा अभियंता | 1) कामांचे अंदाजपत्रक तयार करणे व मंजुरीसाठी सादर करणे. 2) कामांची पाहणी करून अंमलबजावणी करणे. 3) मोजमाप पुस्तके तयार करणे. 4) कामांचे मूल्यमापन करणे | 1) जिल्हा परिषद लेखा नियम 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 13 | कनिष्ठ अभियंता | 1) कामांचे अंदाजपत्रक तयार करणे. 2) कामांची अंमलबजावणी करणे. 3) मोजमाप नोंदी ठेवणे. 4) कामांचे मूल्यमापन करणे. | 1) जिल्हा परिषद लेखा नियम 1968. 2) गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |
| 14 | शिपाई | 1) कार्यालय स्वच्छता राखणे. 2) टपाल आणणे व पाठवणे. 3) इतर कार्यालयीन कामात सहाय्य करणे. | गट विकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार. |